🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

सुविचार संग्रह



सुविचार संग्रह

 स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

 मरावे परी कीर्ती रुपी उरावे.

 हसा खेळा पण शिस्त पाळा.

 नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.
  
 नेहमी खरे बोलावे.

दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा.


जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.


नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.


सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.


आवड असली की सवड आपोआप मिळते .


कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.


एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये.


 तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका ,  

कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.


 बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.


 कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.


विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.


साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.


पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.


काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?


कुणाचेही अंतःकरण न दुखवता बोलणे म्हणजे खरे भाषण !


नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे खूप अवघड.


आशा ही उत्साहाची जननी आहे.


सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते


दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो


केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.


जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.


जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.


बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला का ?


एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.


खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.



आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.


आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.


कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.


एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.


कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.


जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही.


शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.


विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत.


ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !


तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.


दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.


जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?


खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.


वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस !!!


खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची


आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.


जगी सर्व सुखी असा कोन आहे , विचारी मना तुच शोधूनी पाहे...


शिकणार्‍याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.


जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.


जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.


क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.


कर्मण्ये वाधिकारस्ते मा फ़लेषु कदाचन ॥


जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही.


सत्तेपूढे शहाणपण चालत नाही.


गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.


न मागता देतो तोच खरा दानी.


हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.


खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा.


शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.


जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.


आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.


अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !


आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.


जिथे प्रेम कमी असते तिथे दोष दिसू लागतात.


 माहिती आवडल्यास अभिप्राय लिहायला विसरू नका .

3 comments:


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.