🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

जादूचे प्रयोग

जादूचे प्रयोग

PDF डाउनलोड कसण्यासाठी

★★★ येथे क्लिक करा ★★★

विडिओ बघा आणि शिका  
👉👉येथे क्लिक करा👈👈
👉👉येथे क्लिक करा👈👈

🌺 जादूचे प्रयोग भाग  8  🌺🌺🌺🌺

    🍀
कापडाला जाळून पुन्हा निर्माण करणे🍀
कोणतीही हातचलाखी किंवा जादू नाही सरळसरळ विज्ञान तत्वाचा वापर करून हा प्रयोग करून दाखविता येतो
विद्यार्थी च्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षकांनी हे छोटे सोपे प्रयोग विद्यार्थी ना करून दाखविले पाहिजे
🍂 एक सरळ सपट  बुड असलेले धातूचे भांडे घ्यावे  वाटीसुद्धा चालेल एक साधा रंगीत सुती कापड घ्या हा कापड भाड्यांभोवती पुर्ण पणे फिट असा आवरून घ्या टोकाला पिळ देउन हातात जेणेकरून कापड सैल राहणार नाही
  दुसरा एक कापड राॅकेलमध्ये बुडवून चिमट्यमाध्ये पकडून पेटवावा वाटीवरील कापडावर ठेवावा जाळ विझल्यावर राख फेकुन वाटीवरील कापड लोकांना दाखवावे
कापड मुळीच जळालेला नसणार कारण वाटी ही उष्णता वाहक आहे त्यामुळे भांडे उष्णता शोषून घेते कापड जळत नाही
🙏🏻 टिप --  कापड जाळण्याचा प्रयोग लहान मुलांनी करायचा नाही तर मोठ्या  व्यक्ती नी करून दाखवायचा आहे🙏🏻




जादूचे प्रयोग 🌺🌺
         🍀  भाग 5  🍀

📙 शाइ अदृश्य करणे📝📝
🌺 एक लिबूं चिरा लिंबाचा रस एका वाटीत काढून घ्या
🌺 शाइचा पेन घेऊन पेनाची निब  लिबांच्या रसात बुडवा
🌺 पांढर्या शुभ्र कागदावर नाव किवा गुप्त संदेश लिहून काढा
🌺 कागद वाळू द्या अक्षरे गायब झालेली असतील
🌺 आता कागदाला ओव्हनमध्ये 175 डिग्री तापमानावर 10 मिनिटे ठेवा
🌺 किंवा  साध्या लोखंडी तव्यावर सुद्धा  कागद काही वेळ ठेवला तरी अक्षरे पुन्हा दिसायला लागेल
🙏🏻🙏🏻 हा प्रयोग मोठ्या माणसांच्या मदतीने करायचा आहे🙏🏻🙏🏻
🌺 उष्ण तेने लिबूं तील रसायन जळून अक्षरे पुन्हा दिसायला लागतात🌺
-----------'''------
   😄 आणखी एक सोपा प्रयोग🌺😄
     🍀 प्रयोग करण्याआधी आपल्या हातावर साबनाच्या किवां शॅपुच्या पाण्याचे नाव लिहा
🌺 आता प्रेक्षकाकडून काही नावे  वेगवेगळ्या कागदावर लिहून घ्या
🌸 प्रेक्षकामध्ये एक व्यक्ती आपली असायला पाहिजे
🍀 आता आपल्या व्यक्तीचीच चिठ्ठी निवडा किवां गोळा झाले ल्या चिठ्ठीतून त्याचीच चिठ्ठी निवडा
😄 तो कागद पाहता जाळा           मंत्र म्हणण्याची कृती करत
त्याची राख साबुच्या पाण्यावर लावा
😳 चिठ्ठीवरील नाव हातावर उमटेल
 🙏🏻 कागद जाळण्याचा प्रयोग मोठ्या माणसांच्या मदतीने करायचा आहे🙏🏻🙏🏻
 



 🐓  
जादूचे प्रयोग भाग 2🐐
🌺मातीला सेंट चा वास
                    येतो🌺
 बुवाबाजी करणारे ढोंगी महाराज लोकांना नांदी लावण्यासाठी भक्ताला तो उभा असलेल्या ठिकाणची माती आणायला लावतो नतंर तोंड वेडेवाकडे करत मंत्र पुटपुटत आपल्या दोन बोटाच्या चिमटीमध्ये पकडत
ती भक्ताला परत करतो देवाने अत्तर पाठविले म्हणून वास घ्यायला लावतो भोळीभाबडी जनता चमत्काराला बळी पडते
🌺 कृती--चमत्कार करण्याआधी स्टिलचे भांडे घ्यायचे त्याभाड्यांमध्ये मेणाचे काही तुकडे अत्तर टाकुण गरम करावे नतंर थंड झाल्यावर ते एका डबीत बंद करावे
चमत्कार करावयाच्या वेळेस त्या डबीतला थोडा अत्तरमिश्रीत मेणाचा गोळा नखात लपवून घ्यावा किंवा नखाला चिपकवून घ्यावा
  🌺 कृतीच्या वेळेस भक्ताला नस तबांकू अंगारा यात हालचलाखीने मिसळावा हा सेंट ज्यामध्ये मिसळेल त्याचा पुर्ण सुगंध दरवळेल
     



: 💐👍💐👍💐👍💐

विद्यार्थी ना करून दाखविण्यासारखे जादूचे प्रयोग
 🌺जादू कुंकू काळे करण्याची🌺
  शिक्षीत लोकांनी आपल्या शिक्षणाचा विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धेचे निर्मुलन केले पाहिजे
  अर्धा लहान चमचाभर कुंकू वात निरमा पावडर घ्या निरमा पावडरातअल्कली असते आणि कुकंवात अल्कली मिळताच काळे होते
 नेमके हिच कृती करून बुवालोक स्त्रियांना घाबरवून त्यांच्या मनात भीती निर्माण करतात
🌺🌺जादू हळदीचे कुंकू करण्याची🌺🌺🙎🏻🙆🙆
      बाबालोक हळदीमध्येथोडा प्रमाणात आधीच निरमा पावडर मिसळून ठेवतात निरमा पावडर अल्कली असते आणि अल्कली मुळे हळद लाल होते नेमके हिच कृती करून बाबालोक भोळ्याभाबड्या स्त्रियांना घाबरवून फसवितात
🌺🌺 वस्तू गोड करणे🌺
सॅकरीन साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते  बाबालोक ज्याही वस्तू ला हात लावतील ती वस्तू गोड होते तिर्थ गोड होते यासाठी बाबालोकांनी सॅकरीनच्या गोळ्यांची पावडर आधीच हाताच्या बोटाला चोळली असते बिचारे भक्त यापासून अनभिज्ञ असतात आणि याच गोष्टीचा फायदा बाबा उचलतात
🌺लिबांतून रक्त काढणे🌺
साहित्य--एक लिबूं  चाकू मिथील ऑरेंज द्रावण
चाकुच्या पात्याला मिथील ऑरेंज द्रावण लावावे थोड्या वेळाने त्या चाकुणे लिबूं कापल्यास लाल रक्ताप्रमाणे रस बाहेर येतो हि। कृती तुम्ही कोणत्याही मंत्र म्हणता करू दाखवू शकतात लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करू शकता
🌺ताब्यांचे भांडे वर उचलणे🌺ताब्यांचे लोटि घ्या(भरणे) घ्या ते काठोकाठ तांदूळाणे भरूण घ्या त्यामध्ये एक साधारण मोठा पेचकस घेवून तो 4ते5 वेळा टोचा तांदूळाचे दाणे हवा निघून गेल्यावर एकदम फिट होतात तेव्हा पेचकस वर उचलूण घ्या ताब्यां वर उचलला जाइल
🌺🌺 पृथ्वी तून परमेश्वर प्रगट करणे🌺🌺
हा प्रयोग विद्यार्थी ना शाळेत करूण दाखवा
 एक जमिनीमध्ये खड्डा खोदा त्यामधे आधीच एक दोन किलो चणे टाकूण ठेवा त्यावर मुर्ती समजून एक चापट दगड ठेवा वर माती झाकून ठेवा  दोन तिन दिवस त्यावर थोडे थोडे पाणी घालावे  चौथ्या दिवशी मुर्ती म्हणून दगड वर येइल विद्यार्थी ला यामागचे शास्त्रीय कारण समजावून द्या
 🌺 मत्रांने होम पेटविणे🌺
  कृती. ... फाॅस्षरस कपड्यात गुडांळुन सफाईदार पणे होमात ठेवले जाळ होइल किंवा कागदावर पोटॅशियम परमॅग्नेट आधीच लाकडामध्ये टाकूण ठेवून त्यावर तुप ओता(येथे तुप म्हणून ग्लिसरीन ओतावे  म्हणजे आपोआप जाळ होइल ग्लिसरीन मध्ये पेट्रोल टाकल्यास ही क्रिया लवकर होते
 सर्व प्रयोग करतांना भोदूंबाबाची अॅकटीग करावी म्हणजे प्रयोगामध्ये जिवंतपणा येइल लहान मुलांना प्रत्यक्ष प्रयोग करू देता समजावून करून दाखवावे  हे प्रयोग विज्ञान प्रदर्शनी मध्ये करून दाखवू शकता



🍀🍀🍀🍀🌸🌸🌸

😳😳 जादूचे प्रयोगभाग6 😳😳
🔴 कळशी सतत पाणी येणे🔵
 जादूगर कळशीचा आकार लक्षात घेऊन दर 5ते 10 मिनीटानतंर पाणी बाहेर काढून दाखवित असतो या प्रयोगामध्ये कोठल्याही चलाखीची गरज नाही खरी जादू भाड्यांतच असते
🌸 एक पितळेची कळशी घ्या कळशीच्याच उंचीचा एक पितळी ग्लास घा
ग्लासाला खाली बुडाला बारीक बारीक छिद्र पाडून  कळशीच्या तोडांतून आत सोडा   पितळेचे डाग देउन फिट बसवा आता कळशीच्या गळ्याजवळ बारीक छिद्र पाडले की आपले जादू चे उपकरण तयार होइल
    प्रयोगाआधी कळशी पाण्यात बुडवून पाण्याने भरून घ्यावी पेल्यातील छिद्रावाटे पाणी आत शिरते
 पाण्याने भरलेली कळशीचे छिद्र बोटाने दाबून कळशी  प्रेक्षकांसमोर पालथी करावी म्हणजे कळशीतील पेला रिकामा झालेला दिसेल नतंर रूमाल वापरून पेला कोरडा करून दाखवा  🌸थोडा वेळ कळशी बाजुला ठेवा प्रेक्षकांना इतर कश्यातही रमवा पेल्यातील छिद्रावाटे पाणी आत शिरते पुन्हा प्रेक्षकांना  पाणी ओतून दाखवा  असे बरेच वेळा करते येते
🌳 शेवटी कळशीतले पाणी संपले की पेल्यात पाणी येणे बंद होते🌳 प्रत्येक वेळी कळशीत पाणी कमी कमी येते🌸


👉👉येथे क्लिक करा👈👈
: 😳😳😳😳😳😳😳

🍀🍀 जादूचे प्रयोग भाग 7 🍀🍀 कोळसा पेढा बनतो🌸🌸😄
 अतिशय सोपा प्रयोग अगदी लहान मुले सुद्धा करून दाखवू शकतात
 एक गोलाकार लाबंट डबा घ्या🌸 त्याची दोन्ही तोंड कापून काढले की लाबंट पाइपसारखा आकार तयार होइल🌸 डब्याच्या मधोमध  तयार झालेल्या डब्यांच्या आकाराचा पत्रा कारागीराच्या हातून फिट करून घ्या 🌸 दोन्ही तोडांचे झाकण तयार करून फिट करून घ्या🌸
आता तुमच्याजवळ हल्ली एकीकडे तबांकू एकीकडे चुना  ठेवतात याप्रकाराचा डबा तयार झाला असेल🌸
आता प्रयोग सुरू करण्याआधी डब्याच्या एका बाजूला कोळसा दुसऱ्या बाजूला पेढे चाॅकलेट खान्याचे जिन्नस भरून ठेवा🌳
प्रेक्षकांना डबा दोन भागात विभागला गेला हे लक्षात येणार नाही😜 प्रेक्षकांना भुसावाला भाग दाखवा खायला लावा अर्थात प्रेक्षक खाणार नाही🍀 आता डब्यावर खोटे मंत्र जादूची छडी फिरवत  हातचलाखी करून डबा उलटा करून घ्या🍀   आता हळुच झाकण उघडून प्रेक्षकांना पेढे चाॅकलेट काढून दाखवा🍀 हा प्रयोग एकदाच करायचा आहे प्रेक्षकांना डब्याला एकच झाकण असते हे लक्षात असल्यामुळे प्रेक्षक फसतात



: 🍺😄🍺😄🍺😄🍺

     ..🍀🍀 जादूचे प्रयोग भाग-3🍀🍀
 🌺 आवडणारी वस्तू खायला देणारा प्याला🌺
जादूगर सुर वातीला प्रेक्षकांना महाभारतातील अक्षय्य पात्र (इच्छा असणारे पदार्थ देणारे पात्र) याविषयी माहिती रंगवून सांगतो याच पात्रातील वस्तू खावून पाडंव बलवान झाले  असेही सागंतो मलासुद्धा  देवाने प्रसन्न होवून एक पेला दिला आहे हा पेला तुम्हाला हवा असणारा कोणताही पातळ पदार्थ देवू शकतो असे सांगून प्रेक्षकांना त्यानां कोणत्या वस्तू हव्या आहेत हे विचारतो             🍺  🍺 दुध चहा कॉफी कोकाकोला लेमनसोडा ताक दही काहीजण बासुंदी सुद्धा मागतात
लोकांच्या मनातील उत्साह पाहुन जादूगर वेगवेगळ्या कृती करत पेल्याला तुम्ही मागीतलेल्या वस्तू देण्याची विनंती करतो
 नतंर तो जादूगर  खिश्यातील काळा रूमाल काढून टेबलवर एका प्यालावर ठेवतो जादूची छडी फिरवून 1,2,3 म्हणत झटक्याने रूमाल उचलतो तो काय प्याला गायब फक्त एक साधा रूमाल असतो रूमाल मागुन पुढून प्रेक्षकांना दाखवून परत खिशात ठेवतो प्रेक्षकांना सागंतो की तुम्ही सर्वांनी वेगवेगळे पदार्थ मागीतले  म्हणून पेला घाबरला पळून गेला आता माझीसुद्धा पंचाईत  झाली.
🌺🌺कृती🌺🌺
जादूगाराचा रूमाल काळा रंगाचा दुहेरी असतो दोन्ही रूमालाचे काठ शिवत असतांना आत  एक प्लॅस्टिक ची बागंडी नेमकी प्याल्याच्या तोडांच्या आकाराची शिवून ठेवलेली असते बाजुच्या कडा शिवून झाल्यावर ती बागंडी फिक्स राहावी  म्हणून तिला ही शिवणे आवश्यक आहे
          टेबलावर प्याला ठेउन त्यावर हा रूमाल झाकला जातो वर उचलून प्रेक्षकांसमोर नेतांना टेबलाच्या आड ठेवलेल्या टोपलीत अलगद ठेवला जातो त्यामुळे शिवलेल्या बागंडी चा भागच आता जादूगाराच्या हातात राहतो त्यामुळे हातात प्यालाच धरला आहे असे प्रेक्षकांना वाटते रूमालात शिवलेल्या बागंडीमुळे हा भास होतो
🌳🍂आपण स्नेहसंमेलन मध्ये यावर एखादी छोटी नाटीकासुद्धा बसवू शकतो🌴🌲🌱
        


: 🌺🌺
जादूचे प्रयोग 🌺🌺
        🍀भाग4🍀
🌳🌸प्रेक्षकांनी दिलेली वस्तू  गायब करणे पुन्हा प्रगट करून दाखविणे🌸🌳
   हा खेळ विद्यार्थी ना करून दाखवितांना एका विद्यार्थी ची मदत घ्यावी लागेल
  प्रथम जादूगर प्रेक्षकांसमोर मोठमोठे अमिष दाखवित त्याचां कडून एखादी मौल्यवान वस्तू,  अगंठी वगैरे मागून घेतो  तिला एका रूमालात ठेवून एका मुलाजवळ देतो  आता पाच मिनिटात ती वस्तु मोठी होईल असे सागंतो नतंर मुलाजवळील रूमाल झटकतो तर काय अगंठी गुप्त झालेली असते आता जादूगर अंगठीची नुकसानभरपाइ  भरून द्यावी लागेल म्हणुन नाराज होवून खुर्चीवर बसतो तोच त्याचा मदतनीस येतो   म्हणतो तुम्ही सकाळ पासुन काहीच नाही खाल्ले हा पपईचा प्रसाद देवाने पाठविला आहे   हा खा असे म्हणून पपइ चिरताच त्यातून अंगठी निघते        किवा पपई ऐवजी  तो व्यकती  पार्सल आणतो त्यातून प्रथम कागद  कापूस नतंर कापडाच्या आत अंगंठी सापडते ती परत केल्या जाते
🌺😳🌱कृती🌱😄🌺
🌀  दोन एकसारखे काळ्या रंगाची रूमाल घ्या
🌀 त्याच्या कडा शिवून घ्या पण त्याआधी  रूमालात एक अगंठी आधीच ठेवून द्या
🌀 ही अंगठी त्या रूमालात खेळती असते ती कोणालाही दिसतही नाही समजत पण नाही 
😳 आता प्रेक्षकाकडून अगंठी मागा डाव्या तळहातावर रूमाल पसरवितांना ती अगंठी उजव्या हातात लपवून घ्या त्याच हाताने रूमालातील लपवून ठेवलेली अगंठी पकडून तो रूमाल गुडांळुन ती अगंठी शेजारी मुलाच्या हातात द्या   त्याला विचारा तुझ्या हातात अगंठी आहे तो हो म्हणेल
आता ती अगंठी मोठी करण्यासाठी जादूची सडी पाहीजे ती आणण्यासाठी आतमध्ये जा हातातील अगंठी आतमध्ये असणाऱ्या मदतनीसास देवून द्या परत जादूची सडी घेऊन या  मुलाच्या हातावर मंत्र म्हणत तिन वेळा फिरवून रूमाल उचला तर काय  अगंठी गायब
 नतंर नाराज व्हायचे नाटक करायचे आहे तेवढ्यात मदतनीस ठरल्याप्रमाणे पपई पार्सल  बटाटा वांगे  कोणतेही एक घेवून येईल त्यातून ओरीजनल अंगठी काढून दाखवा
  विद्यार्थी ना  हातचलाखी कशी केली ती समजावून सांगा
🌺 स्नेहसंमेलन मध्ये यावर एखादी छोटी नाटीकासुद्धा बसवू शकतो🌴🌲🌱
👉👉येथे क्लिक करा👈👈
👉👉येथे क्लिक करा👈👈
माहिती आवडल्यास अभिप्राय लिहायला विसरू नका

14 comments:

  1. धन्यवाद सर ����

    ReplyDelete
  2. Lay mast prayog mitra mi nakki karnaar

    ReplyDelete
  3. vidio takle tar khup chan samjel.

    ReplyDelete
  4. Chan aahe mi pahilyandach ya blogla bhet dili mi hi mahiti mazya sarv shikshkanna dein khup changlya prakare aapan ya blog chi nirmiti keli aahe tya baddal mi aapale abhinandan karto. . . Dhanyawad

    ReplyDelete
  5. Enter your comment...खूप खुप छान धन्यवाद

    ReplyDelete
  6. छान संकलन
    सुधीर बोरेकर
    गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती
    9420714903

    ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.