सूत्रसंचालन नमुना
सूत्रसंचालन
🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
bmcschoos.blogspot.in
👌 मराठी भाषणांचा संग्रह :-
➡️ https://marathibhashan.blogspot.com/
एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ...........!!
गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........!!
राजाधिराज गणराजाला वंदन केल्यानंतर ज्या आईच्या दुधाने माझी वाणी पवित्र झाली तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या आईने जपल ती आई ज्यांच्या आशीर्वादाने काही करून दाखवण्याची उमेद निर्माण झाली ते वडील यांच्या पायी माझे मस्तकी दंडवत
शब्दांची पूजा करत नाही माणसांसाठी आरती गातो।।
ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो।।
असे ज्यांचे ध्येय होते जे नेहमी सांगत सदगुण हा शुक्राच्या तार्याप्रमाणे शांत व सदैव चमकत असतो जे जे करीन ते ते उत्कृष्ट करीन असे धैर्य असू दे असे मैत्रेय उद्योग परिवाराचे जनक राष्ट्रीय रत्न श्री मधुसूदन रमाकांत जी सत्पाळकर सर यांना विनम्र अभिवादन आणि आमच्या एका शब्दावर विश्वास ठेऊन पुढे पाऊल टाकणारे तुम्ही सर्व तुम्हालाही जय मैत्रेय करून मी या कॉंन्फरंस ला सुरवात करते
अरे भली भली माणसे होऊन गेली कोण होती ती छत्रपती आमचेच होते महावीर आमचेच होते सम्राट अशोक बळीराजा गौतम बुद्ध अरे आमच्याच मातीतले आमच्याच रक्तातले नवं घडवण्याचं सामर्थ्य याच मातीत आहे नवं निर्माण घडवण्याच सृजनशील सामर्थ्य हि याच रक्तात आहे मग आमच्या पुढे आव्हान कुठली ? आमची पावलं झेपावत का नाहीत ? कुठे अडतो आम्ही ?
खूप काही करायचं, घडवायचं, प्रगतीशील बनण्याचं ध्येय मनाशी बाळगून तुम्ही जर मैत्रेय उद्योग परिवारात सामील झाला असाल तर नक्कीच तुमचीही स्वप्न साकार होतील कारण या परिवाराच ब्रीदवाक्यच आहे " इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो " मित्रांनो स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य तुमच्या अंगी असायला हवं आणि म्हणूनच आपणा सर्वांसाठी तो मार्ग खुला कसा करता येईल यासाठी करिअर विषयी मार्गदर्शन करण्यासाठी मैत्रेय उद्योग परिवारातील कर्तुत्ववान मानसं आपणास लाभलेले आहेत काही क्षणातच सर्व मान्यवरांचे या हॉंल मध्ये आगमन होणार आहे तरी कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे आहे
--------------------------------------------------आगमन------------------------------------------------
मनुष्याची श्रेष्ठता हि त्याच्या कर्तबगारीने ठरते व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तुत्ववान मान्यवरांचे व आज या विभागीय कॉंन्फरंस साठी वेगवेगळ्या विभागातून उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी सहकार्यांचे मी सौ रोहिणी माने पुन्हा एकदा मन पूर्वक स्वागत करते .
मी आवर्जून सांगते मुलगा आणि वडील होते वडिलांना काहीतरी काम करायचे होते मुलगा काम करू देत नव्हता सारखा त्रास द्यायचा वडिलांच्या लक्षात आलं मुलाला कुठल्यातरी कामात गुंतवल पाहिजे त्याशिवाय मला काम करता येणार नाही समोर एक जगाचा नकाशा पडला होता वडिलांनी हातात घेतला टराटरा फाडला दहा बारा तुकडे केले मुलाच्या हातावरती ठेवले आणि त्याला सांगितले सगळा नकाशा पुन्हा जोडून टाक मगच माझ्याकडे ये वडिलांना खात्री होती नकाशा जोडायला मुलाला अर्धा तास तरी लागेल आणि तेवढ्या वेळात आपले काम आटोपून पुरे होईल मुलगा नकाशा जोडायला बसला वडील कामाकडे गेले पण कामा पर्यंत पोहचातायेत न पोहचातायेत तोच मुलगा जगाचा नकाशा जोडून घेऊन आला बाबा नकाशा जोडून झाला वडिलांना आश्चर्य वाटलं इतक्यात कसकाय जमलं तुला ? मुलगा म्हणाला बाबा ज्या नकाशाचे तुकडे तुम्ही मला दिले होते त्या नकाशाच्या मग एका माणसाच चित्र होत मी माणूस जोडला उलटून बघितलं जग आपोआपच जोडलं गेलं होत आज समोर नजर टाकली तर लक्षात आलं मैत्रेय मुले सबंध समाज जोडला गेलाय आजचा दिवस उलटू द्या उद्या संपूर्ण जग जोडल्याच तुम्हाला याच देही याच डोळा दिसल्याशिवाय राहणार नाही
सत्पाळकर साहेबांनी आयुष्यभर एकच वसा पेलला आणि तो म्हणजे माणूस जोडण्याचा अस आदर्श जीवन जगणार्या व इतरांसाठी आपलं जीवन समर्पित करणार्या आदरणीय मधुसूदन रामाकांत्जी सत्पाळकर साहेब यांच्या प्रतिमेच पूजन करण्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करते .
स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही
तरी इतरांसाठी जागून बघावं
दुसर्याच्या डोळ्यातील आसवं पुसताना
त्यात आपलंच प्रतिबिंब बघावं
अस आदर्शवत जीवन जगणाऱ्या सत्पाळकर साहेबांच्या प्रतिमेच पूजन झालेलं होत आहे
-------------------------------------प्रतिमा पूजन ---------------------------------------------------------
मन शांत प्रसन्न आणि उल्हासित ठेवण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत असते त्यात अंधश्रद्धेचा कोणताही भाग नसतो काळजातला अंधकार आणि चिंता प्रार्थनेने नाहीशा होतात मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे अकल्पित आणि अनपेक्षित अशी मन शांती मिळते अशा वेळी सभोतालचे जग आणि आजूबाजूचा निसर्ग सुंदर वाटू लागतो म्हणूनच दुखीतांच्या जीवनातील दुख दूर व्हावे या आशयाची कवी वसंत बापट यांची सत्पाळकर साहेबांना प्रिय असणारी कविता आपण प्रार्थना म्हणून घेणार आहोत
------------------------------------------प्रार्थना------------------------------------------------------------
धन्यवाद!!
मान्यवरांना मी आसन ग्रहण करण्याची विनंती करते
यानंतर वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत .
---------------------------------------------सत्कार -------------------------------------------------------
यानंतर श्री ............................................................. यांना मी कार्यक्रमाच प्रास्ताविक करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते
----------------------------------------प्रास्ताविक ---------------------------------------------------------
------------------------------------------------------मार्गदर्शन --------------------------------------------
जीवनात यशस्वी होण प्रत्येकाच्याच पदरात आहे अस नाही पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाही म्हणून .................... गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी ,सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलाकडून सुवास घ्या दुखाःत सुद्धा हसण्यासाठी,काट्या कडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी, आभाळाकडून विशाल सांधे चुका माफ करण्यासाठी, वार्याकडून वेग घ्या प्रगती पथावर अग्रेस होण्यासाठी आणि आमच्याकडून शुभेच्या घ्या यशस्वी होण्यासाठी ....... यशस्वी होण्यासाठी .
यानंतर हम होंगे कामयाब या गीताने कार्यक्रमाची सांगता होईल
--------------------------------हम होंगे कामयाब-----------------------------------------------------------
!#₹##@#@##@#@#@@#@####@@#@@#@#@####@@@##@@##@@@##@@####
चारोळी सुत्रसंचालनासाठी
सुत्रसंचालन चारोळी
दिपप्रज्वलन
अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण ---- (2)
एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.
जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.
संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची
प्रास्ताविक
गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.
प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान
जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून
मार्गदर्शन
तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----
ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा
बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन
आभार
कार्यक्रम झाला बहारदार
भाशणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार
प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.
थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.
व्संतात येतो फुलांना बहार
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार
Nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteएक नं मॅडम
ReplyDeleteएक नं मॅडम
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeletenice sir
ReplyDeleteसऱ, छान उपक्रम!
ReplyDeleteसऱ, छान उपक्रम!
ReplyDeleteएकदम छान
ReplyDeleteएकदम छान
ReplyDeleteKhupch uttam Sudam Bhujbal
ReplyDeleteNice
ReplyDeleteखुपंच सुंदर ...?
ReplyDeleteखूपच छान!!!!!
ReplyDeleteChhan
ReplyDeleteखूपच छान!!!!!
ReplyDeletenice
ReplyDeleteएकदम सुंदर.
ReplyDeleteKhup chan madam
ReplyDeleteKhup chan madam
ReplyDeleteVery..nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteSuperrrrrrrrrrr
ReplyDeleteFabulous & fantastic Sir
ReplyDelete