🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

आदर्श व संगीतमय परिपाठ



असा असावा आदर्श परिपाठ
शालेय परिपाठ-
प्राथमिक शाळेतील . ली ते . वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी - विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन इयत्तेनुसार गट पाडावेत. त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे परिपाठातील विशिष्ट घटकांची जबाबदारी सोपवावी. आठवड्यातील वार वर्गवार विभागून द्यावेत.
उदा. सोमवार-८वी
मंगळवार-७वी असे..
.

पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.
.सावधान- विश्राम आदेश
संचालन करणा-या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.
.राष्ट्रगीत
सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.
.प्रतिज्ञा
आठवड्यात दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत तिस-या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी पुन्हा उरलेल्या दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी. किंवा सलग दोन दिवस एका भाषेतूनही सादर करता येईल.
(
विद्यार्थ्यांचा स्तर पाहून बदल करता येईल.
उदा-७वी-८वी-इंग्रजी, ५वी-६वी-हिंदी, ३री-४थी-मराठी)
.भारताचे संविधान
परिपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील. याही ठिकाणी शक्य असल्यास इंग्रजी, हिंदी मराठी भाषेतून संविधान घेता येईल.
.प्रार्थना श्लोक
ठरलेल्या वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे. प्रार्थना या विशिष्ट धर्माच्या असू नयेत, ज्यातून मानवता, दया, त्याग अशा गुणांची रुजवण होईल अशा असाव्यात.
.पंचांग
केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो, कोणता वार आणि कोणती तारीख आहे.
.सुविचार
सुविचार म्हणजे सुंदर असे विचार. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
.दिनविशेषउगवणाऱ्या प्रत्येक दिवशी काही काही घटना घडून गेलेली असते आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे --- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
.आजची म्हण वाक्यप्रचार
म्हणीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ लपलेला असतो, म्हणून आजची म्हण घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह सांगावा त्याचा वाक्यात उपयोग करुन दाखविण्याची संधी समोर उपस्थित विद्यार्थ्यांना द्यावी.
.बातमीपत्र
जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे समजत असते. म्हणून आजच बातमीपत्र घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
१०.समूहगीत/देशभक्तीपर गीत
आठवड्यातील दिवस वेगवेगळी गीते घ्यावीत. त्यात एखादे स्फुर्तीगीतही असावे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे.
११.बोधकथा
आजची बोधकथा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
१२.प्रश्नमंजुषा
आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
(
सोपे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारले तर चांगले.)
१३.वैज्ञानिक दृष्टिकोन
समाजात अनेक समज-गैरसमज असतात. त्यामूळे अंधश्रद्धा पसरतात, म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.
(
शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.)
१४.इंग्रजी शब्दार्थ 
आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
(
सोपे इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)
१५.दिनांक तो पाढे
गणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते. तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
(
प्रतिदिन ते ३१ पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)
१६. आजचे वाढदिवस
स्वतःचा जन्मदिवस स्वतःसाठी खिस असतो. तर असे आजचा दिवस खास बनवणारे आहेत---
वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थी/शिक्षकांचे नाव घ्यावे फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.
१७.पसायदान
बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून सरळ बसुन समूहाने पसायदान घ्यावे.
१८.मौन
मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.
१९.विसर्जन
विद्यार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवाव्या आपापल्या वर्गात रांगेत जावे.


******************************************************************************************************************************
NOTE: download करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा उजव्या बाजूला download वर क्लिक करा  
१) राष्ट्रगीत  संगीता शिवाय 

२) राष्ट्रगीत  संगीतासह 

३) प्रतिज्ञा  मराठी 

४)प्रतिज्ञा   हिंदी 

५) संविधान  संगीतमय 

६) पसायदान


************************************************************************************************************************

संगीतमय प्रार्थना 

     १)"देह मंदिर, चित्त मंदिर, एकतेची प्रार्थना" 
                          डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा

  २)  "वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम्" 
                           डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा      

     ३) "तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो"
                           डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

      ४)"या भारतात बंधुभाव नित्य वसू दे"
                          डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

      ५) "इतनी शक्ती हमें देना दाता" 
                          डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा    

       ६) "सत्यम् शिवम् सुंदरम्" 
                       डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा             
                          
            

    ७) "सर्वात्मका शिवसुंदरा स्विकार या अभिवादना" 
                       डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा     

       ८)"खरा तो एकची धर्म" 
                       डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा       ************************************************************************************************************************ ***************************समूहगीते  ************************                                          
       
                                          
  १)"हम होंगे कामयाब" 
                  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा     
     
       २)"इन्साफ की डगर पे बच्चो दिखावो चलके"
                      डाउनलोड  करण्यासाठी येथे क्लिक करा                                                                                                    
३)"बलसागर भारत होवो" 
                    डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा     

४)"सारे जहाँ से अच्छा" 
         डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा          


7 comments:

  1. इतका परिपूरण अॅप मी कोणाचाच नाही पाहिला.सर्व काही एकाच ठिकाणी मिळणे शक्य नाही आपल्या टिमंचे जि.प.प्रा.शा.भेंड बु.ता.गेवराई जि.बीड कडून अभिनंदन करत आहे, आम्हाला जे काही पाहीजे ते सर्व मिळाले.thank u

    ReplyDelete
  2. खरा शिक्षक मित्र

    ReplyDelete
  3. Excellent Blog

    ReplyDelete
  4. परिपूरण अॅप आपल्या टिमंचे अभिनंदन करत आहे, आम्हाला जे काही पाहीजे ते सर्व मिळाले.thank u

    ReplyDelete
  5. खरा शिक्षक मित्र

    ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.